प्रेयसीच्या गालाचा चावा घेतला… पुण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल!

उंड्री : प्रेमप्रकरणात ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढेच नाहीतर त्याने प्रेयसीच्या गालाचा चावा घेणाऱ्या प्रेमवीरावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उंड्री, तसेच दोराबजी मॉल परिसरात 31 मार्च रोजी घडला आहे. दानीश नायर (वय-22 रा. ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यामध्ये सध्या ब्रेकअप झाले असून, त्यांच्यात वाद सुरु आहेत. 31 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तिला पाहून घेण्याची धमकी देऊन मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गालाचा चावा घेऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *