पुणे : सिद्धू मुसेवाला हत्या : संतोष जाधव व सौरभ महाकालकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली, पोलिसांची माहिती

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे. तर नवनाथ सुर्यवंशीची संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आली. त्या प्रकरणी मंचर येथून सौरभ महाकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, सौरभ महाकाळची चौकशी सुरू असताना नवनाथ सुर्यवंशी याने संतोष जाधवला गुजरात येथील भूज येथे आसरा दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून गुजरात येथून संतोष जाधव याला रविवारी (१२ जून) ताब्यात घेण्यात आले. यावेळी संतोष जाधवने टक्कल केल्याचं आढळून आलं. ओळख लपवून ठेवण्यासाठी त्याने टक्कल केल्याचे आरोपी संतोष याने सांगितले.

संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी ते पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. नवनाथ सुर्यवंशी याने संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक माहिती समोर येईल असे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply