
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पूर्व भागातील वर्तुळाकार रस्त्याच्या हवेली तालुक्यातील १५ गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी पूर्ण झालेल्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या वर्तुळाकार रस्त्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन मार्ग करण्यात आले आहेत. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्यांतून जाणारा हा रस्ता ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. पूर्व भागातील प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. एकूण ४२ गावांतून हा रस्ता जातो. या रस्त्याचे मार्ग निश्चित करण्यासाठीचे आदेश प्रसृत करण्यास विलंब झाला. परिणामी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या प्रकल्पाच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये हवेली तालुक्यातील १५ गावांतून हा रस्ता जातो.
या सर्व गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. वर्तुळाकार रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील प्रकल्पाचे कामही जलदगतीने सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निधीमुळे कामांना गती
महाविकास आघाडी सरकारने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पुण्यातील वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादानासाठी १५०० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी संबंधित गावांत करण्यात येणारी मोजणी, भूसंपादन आणि इतर अनुषंगिक कामांना वेग आला आहे. पुढील एका महिन्यात संपूर्ण गावांचे दर निश्चित करून प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हवेली तालुक्यातील प्रकल्पातील गावे
पूर्व भागात हवेली तालुक्यातील तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे आणि आळंदी म्हातोबाची या गावांचा समावेश आहे. तर, पश्चिम भागात हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण आणि बहुली या गावांचा समावेश आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

