पुणे : लोणी काळभोर टोलनाक्यावर दोन कारचा भीषण अपघात; २ ठार, ३ गंभीर

पुणे : लोणी काळभोर टोलनाक्यावर दोन कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुण्याहून यवतकडे जाणाऱ्या तसेच यवतच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या २ गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. यवतकडे जाणारी गाडी भरधाव वेगात होती. गाडीवरील नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला धडकली. हाअपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात एका गाडीचा चालक आणि एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्या कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *