पुणे :  रेल्वेत मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पुण्यातून अटक ; भोपाळ ते पुणे झेलम एक्स्प्रेसमधील घटना

पुणे : झेलम एक्सप्रेसमध्ये भोपाळ ते पुणे प्रवासादरम्यान पॅन्ट्रीकारमध्ये जेवण देण्याच्या बहाण्याने नेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (१९ जुलै) भोपाळ येथे घडली. मुलगी भुसावळ स्थानकावर उतरल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तपास करीत आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना पुण्यातून अटक केली. 

भोपाळ ते पुणे प्रवासादरम्यान भोपाळ येथे एक अल्पवयीन मुलगी अनावधानाने वातानुकूलित डब्यात बसली होती. यावेळी ‘तू या डब्यात का बसलीस, तुला तिकीट तपासनीस पकडतील’, अशी धमकी देऊन रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने तिला जेवण देण्याच्या बहाण्याने पॅन्ट्रीकारमध्ये नेले. भोपाळ रेल्वे स्टेशन येथून गाडी सुटल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी तिला पॅन्ट्रीकारमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तेथेच रडत बसली होती. एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीने तिच्याकडे विचारणा केली असता हा प्रकार समोर आला.  याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे पोलिसांनी मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध घेतला. या कालावधीत रेल्वे पुणे स्थानकावर आली होती. त्यामुळे पोलिसांनी पुणे स्थानक परिसरातील लॉज, उपाहारगृहांची तपासणी केली. या दरम्यान संशयीत आरोपी हे घोरपडीतील श्रावस्ती नगर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या तिघांना पुढील तपासासाठी भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply