पुणे : राज्यातील १६ हॉस्पिटल मधील HMIS सिस्टीम अचानक बंद; सरकारच्या 'या' निर्णयामुळे गोंधळ

पुणे - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील १६ हॉस्पिटल मधील HMIS म्हणजेच हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अचानकपणे बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या  या निर्णयामुळे हॉस्पिटल्स मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल आहे. त्या ठिकाणचं कॉम्प्युटर बेस्ड व्यवस्थापन पार कोलमडलं आहे. रुग्णांची नोंदणी कॉम्प्युटर ऐवजी कागदावर हातानं लिहून करावी लागत आहे. इतकंच नाही रुग्णाच्या आजाराविषयीच्या जुन्या नोंदीही गायब झाल्या आहेत. अचानक पणे घेतलेल्या या निर्णयामुळे हॉस्पिटल मधील स्टाफ तसेच डॉक्टर्स संताप व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इआयटी सर्व्हिसेस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीकडून मागील १३ वर्षे HMIS प्रणाली राबवण्यात येत होती. आर्थिक कारणांमुळे कंपनी आणि सरकारमध्ये वाद आहे. तो न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंद कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये व्हावी, वेगवेगळ्या चाचण्यांचे अहवाल डॉक्टरांना कॉम्प्युटरवर पाहता यावेत असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सरकारी हॉस्पिटल चा कारभार स्मार्ट तसेच सुलभ होण्यात तो अत्यंत उपयुक्त ठरला होता. असं असताना हा अनाकलनीय निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न विचारला जात आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply