पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्याकडून महिलेला मारहाण एकास अटक; साथीदारांच्या विरोधात गुन्हा

व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने महिलेला मारहाण केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. कोंढवा भागात ही घटना घडली. शेरखान चाँदखान पठाण (रा. शेरखान चाळ, ग्रीन पार्कजवळ, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पठाण याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला पैशांची गरज होती. तिने पठाण याच्याकडून दरमहा वीस टक्के व्याजाने वीस हजार रुपये घेतले होते. व्याजासह तिने पठाणला ५८ हजार ४०० रुपये परत केले होते. पठाणने महिलेकडून कोरा धनादेश घेतला होता. पैसे परत केल्यानंतर तो महिलेला त्रास देत होता.

पठाणने महिलेला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि पैसे का दिला नाही, अशी विचारणा करुन तिला मारहाण केली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पठाण आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.

Follow us -

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply