पुणे : नेत्यांनी वक्तव्य करताना भान ठेवावं”- अजित पवार

पुणे : राज्यामध्ये सध्या लोडशेडिंग सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची सध्या टंचाई आहे. विविध राज्यामध्ये हवा तेवढा कोळशाचा पुरवठा होत नाही. यामुळे परदेशामधून देखील कोळसा आयात करण्याचा निर्णय झाला आहे. शिवाय छत्तीसगडमधील खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधींनी देखील यामध्ये छत्तीसगड राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

देशभर सध्या कोळशाचा तुटवडा आहे. यामुळे राज्यांना योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नाही. शिवाय रेल्वेमधून इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते. याप्रश्नी कोणते देखील राजकारण करायचे नाही. मात्र, देशभर कोळसाटंचाई आहे, हे सत्य असल्याचे ते यावेळी सांगितले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल किंवा नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हणाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply