पुणे - महापालिका (Pune Municipal) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारे साफ (Drainage Cleaning) करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या २८ निविदा (Tender) मंजूर केल्या असून, आज त्यास प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी घेतलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यातील बहुतांशी महापालिकेने निश्चीत केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा ३५ टक्के ते ४२ टक्के कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा काय राहणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यासह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्यासाठी निविदा काढली जाते. त्याचप्रमाणे शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे टाकलेल्या असतात, त्यांची देखील सफाई करणे आवश्यक असते. महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर वेळेत नालेसफाई करणार असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले व पावसाळी गटारे साफ करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये नाले सफाइच्या १३ निविदा आणि पावसाळी गटारांच्या १५ निविदा स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आल्या होत्या. त्यास आज मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी नाले सफाईसाठी सरासरी ७५ लाख रुपये तर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी सरासरी ४९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने मागविलेल्या निविदेत ही सर्वच कामे पूर्वगणनपत्रकापेक्षा ३५ ते ४२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. त्या सर्व मान्य करण्यात आल्या आहेत.
तर केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची नाले सफाईची निविदा १० टक्के कमी दराने आली होती, त्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली नाही.
३२ टक्के अनामत रक्कम
महापालिकेने निश्चीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने निविदा आली असेल तर, निविदेच्या १० टक्के कमी दरापर्यंत एक टक्का रक्कम अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. तर १० टक्क्याच्या पुढे प्रत्येक टक्क्यासाठी एक टक्का रक्कम घेतली जाते. त्यामुळे ज्या निविदा ३५ टक्के ते ४२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. त्या ठेकेदाराकडून २५ ते ३२ टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून घेतली जाणार आहे, त्यामुळे त्यांना कामे व्यवस्थितच करावे लागतील असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
- जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील नाल्यांची लांबी - ६४७ किमी
- पावसाळी गटारी - १५० किमी
- चेंबर्सची संख्या - ३१०००
- नाले सफाईच्या निविदांची संख्या - १३
- पावसाळी गटारांच्या निविदेची संख्या - १५
-
एकूण रक्कम -१०.८९ कोटी
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




