पुणे :ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांकडून पावणेदहा लाखांचा गंडा; महावितरणचा अधिकारी असल्याची बतावणी

पुणे : महावितरणमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून नऊ लाख ७९ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मीरानगर परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर वीज बिल भरण्याबाबतचा संदेश पाठविला. त्यानंतर महावितरणधील अधिकारी आयुष कुमार बोलत असून वीज बिल भरण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करावे लागेल, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती चोरट्यांकडे गेले. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून दोन वेळा एकुण मिळून नऊ लाख ७९ हजार रुपये रक्कम लांबविली.

खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागिरकाने पोलिसांकडे तक्रार दिली.गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.

वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरुन बनावट संदेश पाठवून चोरट्यांकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे वैयक्तिक क्रमांकावरुन वीज बिल भरण्याबाबत संदेश आल्यानंतर चोरट्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply