पुणे: चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला मला भाग पाडलं; कुचिक प्रकरणात पीडितेचा धक्कादायक खुलासा

पुणे: रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेनं 'साम टीव्ही'वर खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट जबाब नोंदवण्यास मला भाग पाडलं, असा दावा पीडित तरुणीनं केला आहे. (Pune Raghunath Kuchik case)

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरुणीनं तक्रार दाखल केली होती. लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. या प्रकरणातील पीडितेनं याबाबत साम टीव्हीवर धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिनं केला आहे.

महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवाजीनगर पोलिसांत रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरूणीनं दिली होती तक्रार

कुचिक हे शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस

लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा केला होता आरोप

गरोदर राहिल्याने तरूणीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही आरोप

जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही कुचिक यांच्यावर आरोप होता

६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप

आरोपानंतर कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply