पुणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेली ‘सर्वावॅक’ लस आज (गुरुवार, १ सप्टेंबर) बाजारात उपलब्ध होणार आहे. या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) जुलै महिन्यात मान्यता दिली होती.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या लशीचे अनावरण होणार आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यावेळी उपस्थित राहणार आहेत. सीरमतर्फे तयार करण्यात आलेली सर्वावॅक ही एचपीव्ही प्रतिबंधक लस ही क्वाड्रिव्हॅलंट प्रकारातील असून सध्या उपलब्ध लशींच्या तुलनेत तिची गुणकारकता एक हजार पटींनी जास्त असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार, ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. १५ वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. सध्या उपलब्ध लशींमध्ये भारतीय पर्याय नसल्याने हे लसीकरण सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात नव्हते. मात्र, सीरमच्या भारतीय बनावटीच्या लशीच्या उपलब्धतेमुळे हे चित्र बदलणार आहे. सीरमतर्फे बनवण्यात आलेली लस सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने दिलेल्या परवानगीनंतर सीरमचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी दिली होती.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण