
पुणे : गणेश अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरूवात झाली आहे. विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे, पण या कोर्सला विरोध सुरू झाला आहे. प्राध्यापक हरी नरके यांनी या कोर्सला विरोध केला आहे.
'पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्न ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,' असं हरी नरके म्हणाले. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको, असा सवाल विचारला आहे. दरम्यान हा कोर्स कम्पलसरी नाही, ज्यांना नकोय त्यांनी जॉईन करू नये. आराधना धार्मिक कशी असू शकते? असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठीला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,' अशी टीका हरी नरके यांनी केली आहे.
'संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत ते शिकवण्याऐवजी अभ्यासकांच्या मते अगदी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष संस्कृतची गोडी लावणे, मन:शांती व व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावणे कितपत योग्य?,' असा सवाल हरी नरके यांनी विचारला आहे.
'एखाद्या खाजगी संस्थेने काय करावे हा मुद्दा वेगळा आहे. माझा गणेश अथर्वशिर्षाला विरोध नाही. शासकीय अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठाने संविधानाच्या कलम ५१ चे पालन करण्याऐवजी असे एका धर्माचे लेखन विद्यापीठातर्फे शिकवणे,विद्यापीठाच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र देणे हा निर्णय चुकीचा आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक प्रबोधन यांचा मोठा वारसा आहे. याच न्यायाने उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील, हे सारे भयंकर आहे,' असं हरी नरके म्हणाले.
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे.
शहर
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
- एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
महाराष्ट्र
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel


