पुणे : केशवनगरमध्ये मुळा-मुठा नदीवर जलपर्णीची चादर

मुंढवा: महापालिकेने नदीतील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी ठेकेदार नेमलेला आहे. मात्र, ती नदीतून काढून न टाकता, पात्रातच पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे ती पुन्हा नदी पात्राच्या पुढील भागात ढकलून दिले जात आहे. त्यामुळे जलपर्णी केशवनगर येथील जॅकवेल प्रकल्प जवळच्या बंधाऱ्यात अडकून अर्धा किलोमीटरपर्यंत साठली आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणारे नागरिक किटक, मच्छर, डासांनी हैराण झाले आहेत. येथील जलपर्णी पालिकेने पुर्णपणे नदीपात्राबाहेर काढून नष्ट करावी अशी मागणी अनिल भांडवलकर यांनी केली आहे.

ताडीवाला रोड, बंडगार्डन, कल्याणी पुल, मुंढवा पुल, केशवनगर अश्या ठिकाणाहून गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेकडून जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. ती जलपर्णी ठेकेदाराकडून बाहेर काढली जाते की नाही, याकडे महापालिकेचा एकही विभाग लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगार व जेसीबीवर होणारा खर्च, जनतेच्या कररूपाने भरलेला पैशातून केला जातो. तो अक्षरशः वाया जात आहे. यामध्ये संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप भांडवलकर यांनी केला आहे.

शहरातील हजारो लिटर मैलामिश्रीत पाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जात आहे. मैलामिश्रित पाणी जलपर्णी वाढीस पोषक असल्यामुळे, अगोदरच नदीत असलेली जलपर्णी अधिकच वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत नदीपात्रात प्रचंड जलपर्णी वाढल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे त्या-त्या भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असल्याचे आरोग्य खात्याच्या निदर्शनास आले. तरीही, जलपर्णी नदीपात्राबाहेर काढून नष्ठ करण्यासाठी आरोग्य खात्याने कोणतीही पावले उचलली नाहीत.याबाबत मुंढवा-हडपसर क्षेत्रिय कार्यालयाचे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply