
मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणात कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. ‘हर हर महादेव’ चित्रपट आपण पाहिला नसून नेमका वाद काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही. मात्र लोकशाही पद्धतीने विरोध करावा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांनी ‘हर हर महादेव’ वादासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, “लोकशाही माध्यमातून विरोध करण्यास पूर्णपणे परवानगी आहे. मात्र लोकशाहीच्या विरोधात जाऊन एखाद्या ठिकाणी लोकांना मारहाण करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणात कारवाई होईल,” असं उत्तर दिलं. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फडणवीस यांना चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत पुन्हा हा शो सुरू केला होता. या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. मनसेने याच मॉलमध्ये सायंकाळी ६:१५ वाजता मोफत शो ठेवला आहे. विवियाना मॉलपासून हाकेच्या अंतरावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान असल्याने राष्ट्रवादी- मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी रात्री १० वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. या घटनेत एका प्रेक्षकाला मारहाणही झाली होती. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात आले. त्यांनी हा शो पुन्हा सुरू केला. मंगळवारीही विवियाना मॉलमध्ये मनसेने मोफत शो आयोजित केला आहे. मॉल पासून काही अंतरावरच जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पोलिसांनी मॉलच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली आहे.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




