पुणे : उपनगरात फुकट्या जाहिरातदारांचा धुमाकूळ; पालिकेचा कारवाईकडे कानाडोळा

मुंढवा : बस थांबे, झाड, विजेच्या खांबांवर अतिक्रमण, पथ दिव्यांचे खांब, रस्ता दुभाजक, एवढेच नव्हे तर उड्डाणपूल येथे जागा मिळेल तेथे फ्लेक्सच्या माध्यमातून फुकट्या जाहिरातदारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहराला बकाल स्वरूप आले असून, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचा कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केशवनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क परिसरात जागोजागी जाहिरातबाजी होताना दिसत आहे. केशवनगर, मुंढवा ते कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर ६३७ फ्लेक्स लावलेले आढळले. त्यात व्यवसायिकांचे ५८, कोचिंग क्लासचे ४, स्टॅंडवरचे ७८ तर फ्रेममधील १५, राजकीय ७४, दुकानांचे २४०, विजेच्या खांबांवर ११६, झाडांवर ५२ फ्लेक्स आढळून आले. कोणी कुठे जागा मिळेल त्या जागी बेशिस्तपणे फलकांची उभारणी केलेली दिसली. त्यामुळे उपनगराचे विद्रूपीकरण होवून काही ठिकाणी तर फ्लेक्सचा वाहतुकीलाही अडथळा होतो. या भागात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स व्दारे जाहिरातबाजी केली जाते. परंतु त्यासाठी पालिकेची कुठेही परवानगी घेतली जात नाही. क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत फलकांच्या तुलनेत कारवाई मात्र फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. पालिका सर्वसामान्यांना नियमांचा धाक दाखविला जातो मात्र फुकट्या जाहिरात दारांकडून सार्वजनिक मिळकतीचे विद्रुपीकरण होत असताना त्यावर कारवाई का केली जात नाही. असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply