मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आज याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी तुम्ही विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही? असा प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. तसेच कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील न्यायालयाने फटाकरले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही? असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. त्यावर आम्ही उपाय शोधत आहोत. राज्य सरकारच्या दरबारी अद्याप एसटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय झालेला नाही. आम्हाला आणखी १५ दिवस मुदतवाढ पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारच्या वकिलांनी केली. त्यानंतर एसटी कर्मचारी आत्महत्या करत असताना सरकारला निर्णय घेण्यास उशिर का होत आहे? असा सवाल न्यायालयाने विचारला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने राज्य सरकारला निर्णय घेण्यास उशिर होत आहे, अशी कबुली राज्य सरकारने न्यायालयात दिली.
न्यायालयाने गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे त्रिसद्स्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीने अहवाल सादर केला असून त्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी १५ दिवस पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार मुदतवाढ देण्यात आली असून ५ एप्रिलला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयाने येत्या १ एप्रिलला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच कोरोनामुळे जे कामगार दगावले आहेत, अशा १५० कामगारांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज आले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकार जो निर्णय घेईल तो योग्य की अयोग्य हे आम्हाला ठरवू द्या. तुम्ही संप मागे का घेत नाही? कर्मचाऱ्यांना योग्य सल्ला का देत नाही? असं न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना फटाकारलं.
दरम्यान, राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं धोरण जाहीर करणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात बोलताना दिली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर उत्तर देताना परब बोलत होते.हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




