वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस असून उर्वरित कामही आज पूर्ण झाले आहे. रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण आज म्हणजेच सोमवार, १६ मे रोजी पूर्ण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केलाय.
या सर्वेक्षणासंदर्भात इंडिया टुडेच्या आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केलाय. फोनवरुन दिलेल्याम माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केलाय. या शिवलिंगाच्या संरक्षण आणि जतन केलं जावं या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचंही जैन म्हणाले.
जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग १२ फूटांचे असल्याची माहिती देण्यात आलीय. हिंदूंची बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असल्याचा दावा केलाय.
गेल्या आठवडय़ात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता, मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.
रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती.
शहर
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
महाराष्ट्र
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



