पुणे : कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून कोथरूड, वारजे परिसरातील नागरिकांना नळ स्टॉप चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. मात्र, (रविवारी) सायंकाळी या चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याने या रस्त्यावरील वाहनचालकांची अखेर कोंडीतून सुटका झाली.
वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग कर्वे रस्त्यावरून जात असताना नळ स्टॉप येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार होता. त्यामुळे या चौकात उड्डाणपुलाची गरज असल्याचे समोर आले. यामध्ये मेट्रो आणि पुणे महापालिकेने एकत्र येऊन हा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महापालिकेने ६५.५ कोटी आणि महामेट्रोने १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
स्वातंत्र्य चौक ते एनएसडीटी असा ५४२ मीटरचा हा दुमजली उड्डाणपूल आहे. या पहिल्या उड्डाणपुलावरून वाहने तर त्यावरून मेट्रो धावत आहे. गेल्या रविवारी (ता.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर हा पूलही खुला होणे अपेक्षीत होते. मात्र, एक आठवडा उशिराने हा पूल सुर झाला आहे.
डेक्कनकडून कोथरूड किंवा वारजेच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना आता नळस्टॉप चौकात सिग्नलवर थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच कोथरूडकडून डेक्कनकडे जाणाऱ्या नागरिकांना एसएनडीटी येथून विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळ स्टॉप चौकात येण्याची गरज नाही. त्यांना पौड फाट्यावरून थेट पूर्वीप्रमाणे नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना याचा दिलासा मिळाला आहे.
या उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला अधिकारी यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर चंद्रकांत पाटील यांनी इ बाइकवरून उड्डाणपुलावरून महापौरांसोबत प्रवास केला.
विधी महाविद्यालय रस्त्याला दिलासा
महामेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षापासून एसएनडीटी ते नळस्टॉप ही वाहतूक एसएनडीटीकडून विधी महाविद्यालय रस्त्यावर वळवली. यातील काही वाहने हे नळस्टॉप चौकात येत तर काही वाहने प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता व इतर रस्त्याने डेक्कनकडे जात होती. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व गोंगाट वाढला होता. हा उड्डाणपूल सुरू होताच बहुतांश वाहतूक थेट कर्वे रस्त्याने डेक्कनकडे जाऊ लागली. त्यामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी झाली.
या सुधारणा आवश्यक
- कोथरूडकडून डेक्कनकडे जाताना एसएनडीटीच्या कोपऱ्यावर वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे
- उड्डाणपूल व कर्वे रस्ता खुला असल्याची माहिती पौड फाटा येथेच नागरिकांना माहिती होणे आवश्यक
- त्यासाठी माहिती फलक लावावेत
- कर्वे रस्त्यावरील पीएमटीचा बसथांबा पूर्ववत करणे आवश्यक
- पीएमटी चालक अद्यापही विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळस्टॉप चौकात येत आहेत
-एसएनडीटीच्या कोपऱ्यावरील पूर्ण रस्ता डांबरीकरण करणे आवश्यक
- कर्वेरस्त्यावरील दुभाजकाची कामे लवकर पूर्ण करावीतहे पण वाचा-
शहर
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- विराट कोहली 'अहंकारी' आहे का? रवि शास्त्रींनी सांगितले किंग कोहलीच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे सत्य; केले मोठे खुलासे!
- एसटी बस अनधिकृत ठिकाणी थांबवली तर खबरदार! कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार दंड, महामंडळाचा मोठा निर्णय
- शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
महाराष्ट्र
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- विद्युतीकरण पूर्ण होऊनही मिरज–कोल्हापूर मार्गावर डिझेलचा धूर; प्रवाशांची आधुनिक 'मेमू' ट्रेनसाठी मागणी!
- एसटी बस अनधिकृत ठिकाणी थांबवली तर खबरदार! कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार दंड, महामंडळाचा मोठा निर्णय
- Fraud in Sangli: Man Duped of Rs 9 Lakhs on Pretext of Providing Industrial Fuel
गुन्हा
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

सासवड पोलिसांची मोठी कारवाई! #punenews #BreakingNews #SaswadPolice #PoliceAction #CrimeNews #Mokka
⚠️ धक्कादायक दुर्घटना! बंजी जंपिंगसारख्या थरारक खेळात निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागली. #news
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.

























Subscribe to my channel



