पिंपरी चिंचवड : अतिवृष्ठीमुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद; पावसाची स्थितीपाहून पुढील निर्णय होणार

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस दोन्ही शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळं आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.

दोन्ही शहरातील शाळकरी मुलांना पावसामुळे आणि वाहतुक कोंडीमुळे शाळेत जाण्यात अडथळ निर्माण होत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरसुद्धा जावं लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील घडत आहे. शाळकरी मुलांची सुरक्षा लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 मागील तीन दिवस पुणे शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाध्यावर चांगला पाऊस झाल्याने शहराजवळील चारही धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply