
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुखराज ठाकरे १८ सप्टेबरपासून विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. त्यापूर्वी आज वांद्र्यामध्ये मनसेच्या पक्षांतर्गत बांधणीसंदर्भातील महत्त्वाची बैठक राज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. दुपारी दोनच्या आसपास या बैठकीसाठी राज ठाकरे एमआयजी क्लब येथे पोहचले. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना राज यांनी राजकीय विषयावर भाष्य करणं टाळलं. मात्र त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये काही सूचक विधानं करताना नागपूरला ट्रेनने काय जाणार यासंदर्भात मजेशीर भाष्य केलं.
राज ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या काळात ते विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा करतील. २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याचसंदर्भात विदर्भ दौऱ्यासंदर्भात पत्रकारांनी एमआयजी क्लब बाहेर राज यांना प्रश्न विचारला. आधी पत्रकारांनी बैठकीविषयी विचारलं त्यावर राज यांनी पक्षांतर्गत निर्णयासंदर्भात बैठक असल्याने तुम्हाला फार काही मसाला मिळणार नाही. कुणीच बोलणार नाही, असं स्पष्ट केलं
त्यानंतर पत्रकारांनी विदर्भ दौऱ्यासंदर्भात विचारलं असता राज यांनी, “सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे,” असं उत्तर दिलं. त्यानंतर एका पत्रकाराने तुम्ही नागपूरला ट्रेनने का चालले असा प्रश्न विचारला. त्यावर राज यांनी विमानाच्या वेळा या फारच पहाटेच्या असल्याचं उत्तर दिलं. “मी नागपूरला नेहमी ट्रेननेच जातो. पहाटे ५.५० ला फ्लाईट आहे. एवढ्या सकाळी उठून कोण जाईल. इतक्या सकाळी तिथं जाऊन काय करायचं?” असा प्रतिप्रश्न राज यांनी प्रश्न विचारणाऱ्याला पत्रकाराला केला. राज यांचा हा प्रश्न ऐकून पत्रकारांनाही हसू आलं.
त्याचप्रमाणे राज यांनी नंतर जेट लॅग टाळण्यासाठी आपण रेल्वेने जात असल्याचं सांगितलं. राज हे उपरोधिकपणे हे विधान करत असतानाच एका पत्रकाराला हे खरं वाटलं. त्यावर राज यांनी हसतच, “अरे नागपूरला कसला आलाय जेट लॅग” असं म्हणत हसतच तिथून काढता पाय घेतला.
असा असेल राज यांचा विदर्भ दौरा
२० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. २१ ला राज ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या दौ-यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील २३ ला तेथून मुंबईकडे रवाना होतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
