बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळलं, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत, शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. त्यावरून बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचं पहायला मिळालं, मात्र आता बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं आहे. तारिक रहमान हे मंगळवारी पंतप्रधानपदाची थपथ घेणार आहेत. दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या नव्या सरकारची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता बांगलादेशमधून अधिकृत स्टेटमेंट आलं आहे.
यावर बोलताना बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठं विधान केलं आहे. शेख हसीना या भारतामध्ये आहेत, मात्र त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि बांग्लादेशमधील संबंध आणखी मजबूत होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही हे मान्य करतो की शेख हसीना यांनी मानवाधिकाराच गंभीर उल्लंघन केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. मात्र सध्या शेख हसीना या भारतामध्ये आहेत, आणि त्यांची भारतामध्ये असलेली उपस्थितीचा भारत बांगलादेश संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतानं शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं नाही तरी देखील भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंध हे मजबूत राहातील असं मिर्झा फखरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीएनपीकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तान आणि चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

