नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखरकडून 12.5 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी IPS अधिकारी निलंबित; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून 12.5 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गृह मंत्रालयानं कठोर निर्णय घेत संदीप गोयल यांना निलंबित केलंय.

संदीप गोयल यांचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्लीच्या उपराज्यपालांनी त्यांना पोलीस मुख्यालयातून निलंबित केलं होतं. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बेनिवाल यांना पदभार देण्यात आला.

4 नोव्हेंबर 2022 रोजी 1989 बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांची बदली करण्यात आली. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार, दिल्ली सरकारच्या गृह विभागाचे उपसचिव शैलेश कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *