
दिल्लीतील हीट अँड रन घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. 31 डिसेंबर रोजी एका बलेनो कारने एका तरुणीला 12 तर 15 किलोमीटर फरफटत नेलं, ज्यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. अशीच आणखी एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून समोर आली आहे. यामध्ये सायकलवर कोचिंगसाठी जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारने धडक दिली. या अपघातानंतर कारने विद्यार्थ्याला तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफरटत नेलं असल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ सिनेमा रोडवर अनेक लोकांनी कारचा पाठलाग करून त्या कार चालकाला पकडले. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवाली शहरातील आशा नगर येथील रहिवासी हरिनाम यांचा मुलगा केतन (वय १६) हा शुक्रवारी सायंकाळी लखनौ रोडवर त्याचे मित्र अंश आणि कुणालसह सायकलवरून कोचिंगसाठी जात होता.
घटनेनंतर स्थानिक लोकांनी कारची तोडफोड करत गाडी खाली पाडली. यासोबतच चालकाची धुलाईही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी पोहोचत कार चालकाला ताब्यात घेतलं. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्येही दाखल करण्यात आलं आहे.
ही घटना झबरा पुरवा परिसरात घडली आहे. अपघातात जखमी झालेला केतन हा नववीत शिकतो. तो शुक्रवारी संध्याकाळी सायकलवरुन कोचिंगसाठी जात होता. रस्त्यातच एका भरधाव कारने त्याच्या सायकलला धडक दिली. यामुळे हा मुलगा सायकलवरुन पडला. यानंतर केतन गाडीच्या चाकात अडकला.
केतन गाडीच्या चाकामध्ये अडकल्याचे दिसल्यानंतर स्थानिक लोकांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने गाडी आणखी वेगात पळवली. जवळपास एक किलोमीटर या मुलाला फरफटत नेल्यानंतर कार गर्दीच्या ठिकाणी पोहोचली. तिथे अखेर स्थानिक लोकांनी ही कार थांबवली आणि केतनची सुटका केली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शहर
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
महाराष्ट्र
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
गुन्हा
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: अनैतिक संबंधांच्या वादातून आईच्या प्रियकराची हत्या; पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
- पिंपरी-चिंचवड: आरपीआय नेते अनिल मोरे यांची मोशीत हत्या; हॉटेलमध्ये भरदिवसा थरार
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!




















Subscribe to my channel




