दारूसाठी वाहनचोरी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पुणे (उंड्री) : दारूसाठी वाहन चोरणाऱ्या दोन सराईतांना बेड्या ठोकल्या असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल असून, आरोपीकडून एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रतिक राजेंद्र धरणे (वय ३५, रा. पंचवटी, नाशिक) आणि अक्षय गणपती अंकुशे (रा. कॉईलनगर, लातूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे अधिकारी- कर्मचारी रेकॉर्डवरील वाहनचोरांचा तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांना वाहनचोर हडपसर गावठाण येथील लोहिया उद्याजवळ बिगर क्रमांकाच्या बुलेटवर थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता हडपसर, यवत, वळसंग, पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, राजेश अभंगे, शाकिर खान, विनायक रामाने, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, मुकुंद पवार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply