पुणे - महावितरणकडून हाती घेण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी’ (Solar Agriculture Pump) योजनेतंर्गत आतापर्यंत १ हजार ४४० मेगावॉट क्षमतेचे करार झाले आहे. तर १०८ सौर कृषिवाहिन्यांद्वारे राज्यभरात ४५ हजार ६६४ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महावितरण मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ किलोमीटरच्या परिघात २ ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प कार्यान्वित करून संबंधित कृषिवाहिनीद्वारे कृषिपंपांना वीजपुरवठा देण्याचे निश्चित केले आहे. असे प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणकडून निविदा काढली आहे. यापूर्वी १ हजार ३०० मेगावॉटसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये प्रथम महावितरणला १११ मेगावॉटचा प्रतिसाद मिळाला होता. परंतु आणखी प्रतिसाद मिळावा यासाठी नुकत्याच काढलेल्या निविदांना तब्बल ३८५ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्पांचा प्रतिसाद मिळाला आहे, असे महावितरणने कळविले आहे.
महावितरणकडून आतापर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी उभारलेल्या विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्पांमधील १ हजार ४४० मेगावॉट क्षमतेच्या वीजखरेदीचे करार केले आहेत. त्यापैकी ३९६ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. त्यात लवकरच १११ मेगावॉटची आणखी भर पडणार आहे.
आतापर्यंत राज्यातून सौर प्रकल्पांच्या जागांसाठी १ हजार १११ अर्जांद्वारे एकूण १६ हजार ४९ एकर जागेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तांत्रिक पाहणीमध्ये यामधील ४ हजार ८ एकर जमीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे दिसून आले. उर्वरित जागांची पाहणी करण्यात येत आहे. अर्ज मंजूरीची प्रक्रिया सुरू केली आहे. नापिक व पडीक जमिनी भाडे पट्टीवर देण्यासाठी जमीनधारकांनी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून केले आहे
महावितरणच्या २ हजार ७२५ उपकेंद्रांच्या ५ किलोमीटर परिघात कमीतकमी ३ तर जास्तीत जास्त ५० एकर क्षेत्रफळाच्या शासकीय व खासगी नापीक व पडीक जमिनी भाडेपट्टीवर घेण्यात येत आहे. राज्य शासनाने नाममात्र एक रुपया भाडे पट्टीवर ३० वर्षांसाठी शासकीय जमिनी घेण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक, समूहगट, सहकारी संस्था जमिनींसाठी प्रतिएकर प्रतिवर्ष ३० हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. तसेच भाडेपट्टीमध्ये दरवर्षी तीन टक्के वाढ होणार आहे.
शहर
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
महाराष्ट्र
- बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार? समोर आली मोठी माहिती, देशभरात ८ कॉरिडॉर झाले निश्चित!
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!



























Subscribe to my channel


