दहावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्यात कोकण पहिला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६आहे. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी

पुणे: ९६.१६

नागपूर: ९७.००

औरंगाबाद: ९६.३३

मुंबई: ९६.९४

कोल्हापूर: ९८.५०

अमरावती: ९६.८१

नाशिक: ९५.९०

लातूर: ९७.२७

कोकण: ९९.२७



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *