मुंबईत बुधवारी ढगाळलेले वातावरण होते. पुढील तीन दिवस मुंबईत ढगाळलेले वातावरण असेल, तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पावसाचा प्रभाव या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कायम राहील. विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी किमान तापमानाचा पारा चढा आहे. पावसाळी वातावरणामुळे कुलाबा येथे २६.५ तर सांताक्रूझ येथे २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान बुधवारी नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.३ आणि १.५ अंशांनी अधिक होते. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर कुलाबा येथे कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, सांताक्रूझ येथे कमाल तापमानात मंगळवारपेक्षा १.५ अंशांची वाढ होऊन ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सापेक्षा आर्द्रता ८० टक्के होती, तर सांताक्रूझ येथे ६३ टक्के होती. येत्या शनिवारपर्यंत मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अनुभव येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी मुंबईसोबतच डहाणू आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे होते. रत्नागिरीमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक नोंदले गेले. रत्नागिरी येथील कमाल तापमानामध्ये गुरुवारी किचिंत घट होण्याची शक्यता आहे. गुरुवार ते शनिवार या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही अधिक असेल. सिंधुदुर्गामध्येही रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार शुक्रवारी, तर डहाणू येथे गुरुवारी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे आठवडाअखेरीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पुण्यातही गुरुवार ते शनिवार आणि अहमदनग येथे गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. नाशिक येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड, लातूरमध्ये शनिवारपर्यंत तर उस्मानाबादमध्ये रविवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गुरुवारी तसेच शुक्रवारी हलका पाऊस पडू शकतो. गडचिरोलीमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळामध्ये वाढलेल्या तापमानाच्या प्रभावाखाली राज्यात मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती असते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. पश्चिमी प्रकोपाच्या परिणामामुळे मध्य भारतात वाऱ्यांची दिशा बदलत असून त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस असे असेल असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले. विदर्भात उष्णतेच्या लहरीमुळे कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहे. ब्रह्मपुरी येथे बुधवारी सरासरीहून ४.४ अंशांनी अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ४५.३ तर चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. अकोला, अमरावती, गोंदिया, वर्धा या केंद्रांवर ४४ हून अधिक कमाल तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात नांदेड येथे ४२.२ तर परभणी येथे ४३, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे ४३.४, जेऊर येथे ४२, मालेगाव आणि सोलापूर येथे ४३ तर तर सांगली येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
शहर
- एल निनोचे सावट: महाराष्ट्रात यंदा पावसाचा जोर कमी राहणार, पेरणीसाठी शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
महाराष्ट्र
- एल निनोचे सावट: महाराष्ट्रात यंदा पावसाचा जोर कमी राहणार, पेरणीसाठी शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.























Subscribe to my channel


