ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे – विलास लांडे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आणि ह्या बारा वर्षानंतर उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे लावण्याचं शहाणपण पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचलं आहे. बारा वर्षे सुरक्षा कठड्याशिवाय भोसरी येथील राष्ट्रमाता जिजाऊ उड्डाणपुलावरून वाहतूक सुरु होती. त्यामुळे महापालिका गेल्या बारा वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत होती का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कोणतेही उड्डाणपूल सुरू करताना त्यांच्या सेफ्टी एनओसी संबंधित विभागाकडून घेण्यात येतात. भोसरी उड्डाणपुल सुरू करताना देखिल सेफ्टी एनओसी घेण्यात आल्या असाव्यात. मात्र, सेफ्टी एनओसी घेतल्याच्या बारा वर्षानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावले आहेत. त्यामुळे महापालिकेला बारा वर्षानंतर उशिरा शहाणपण सुचलं की काय? अशी उपरोधक टीका होत आहे.

उड्डाणपुलाला खरंच सुरक्षा कठडे यांची आवश्यकता होती का? कि फक्त ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे लावले? असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. तर महापालिकेच्या महापालिकेच्या स्थापत्य विभागाने या सुरक्षा कठड्याविषयी कॅमेऱ्या समोर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. उड्डाणपुलाचे स्क्रॅचगार्डची उंची कमी असल्याने आम्ही ती उंची वाढवण्यासाठी सुरक्षा कठडे वाढवून लावले आहेत. अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply