जमीन मोजणी होणार अवघ्या 30 मिनिटांत

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीची मोजणी आता ३० मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ११ रोव्हर मशिन भूमि अभिलेख विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या मशिनच्या सहायाने अचूक आणि कमी वेळेत मोजणी करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरूनही करावी लागणारी प्रतिक्षा कमी होणार आहे. जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० सेकंदात घेता येते. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून हे रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे. हे रोव्हर खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला देण्यात आला होता. यातून ३५ रोव्हर खरेदी करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ११ रोव्हर प्राप्त झाले आहेत. एका रोव्हरमुळे दररोज चार ते पाच ठिकाणच्या मोजणी पूर्ण होणार आहे. यामुळे जिल्ह्यात जमिनीची मोजणी गती वाढणार असून मोजणीची प्रक्रिया अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार आहे. सर्व्हे ऑफ इंडियाकडून पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला ११ रोव्हर मशिन प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी शंभर कर्मचाऱ्यांना या रोव्हरद्वारे मोजणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उर्वरित २४ मशिन लवकरच येतील. त्यामुळे मोजणीचे काम गतिमान आणि अधिक अजून होण्यास मदत होणार आहे. एका मोजणी केल्यानंतर भविष्यात पुन्हा त्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मोजणीची गरज पडणार आहे. पैसे भरल्यानंतर कोर्डीनेटवरून मोजणीची प्रत लगेच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. - किशोर तवरेज, भूमी अभिलेख विभाग


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply