पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेत वाढ

पुणे : देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण होणार आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने उद्या सकाळी ८ ते १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी डीजी रजनीश सेठ यांनी पोलीस पथकासह देहूतील शिळा मंदिर, मुख्य मंदिर परिसराला सुरक्षेच्या कारणास्तव भेट दिली होती. त्याठिकाणची पाहणी करण्यात आली. देहूतील शिळा मंदिर, मूर्तीचा लोकार्पण होताच देहूपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply