कल्याणमध्ये गॅस गळती होऊन स्फोट; दोन महिला जखमी

कल्याण पश्चिम येथील एका इमारतीत गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 'सर्वोदय हाईट्स' असे इमारतीचे नाव आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील आरटीओ सर्वोदय हाईट्स इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होत असल्याने इमारतीत पाणी मारून अग्निशमन दलाने गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सिलेंजरची गळती थांबवत गळतीवर नियंत्रण आणले.

या घटनेत सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव असून दोघी सासू-सून आहेत. याच दरम्यान घरात बेडरूममध्ये महिला व तिचे दीड महिन्याचा बाळ होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. स्फोटात किचनचे नुकसान झाले आहे. घरी स्वयंपाक करताना गॅसगळतीमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply