
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी, तसेच कल्याण – नवी मुंबई परस्परांना जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाआड आलेल्या झोपडपट्टीमधील १०८० पैकी ८७१ प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरास नकार दिला आहे. त्यामुळे ऐरोली – कळवा उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याचे स्वप्न धूसर बनले आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी भूसंपादनास विरोध केल्यामुळे प्रकल्प रखडल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांनी दिली. या वादात आता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली आहे. हा उन्नत मार्ग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमआरव्हीसीचा मानस होता. परंतु आता हा मुहूर्त हुकण्याचीच चिन्हे आहेत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याणहून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पकडण्यासाठी ठाणे स्थानकात यावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी व कल्याण रेल्वेमार्ग नवी मुंबईला जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला होता. डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी ३ योजनेला मंजुरी मिळाली. मात्र मार्गिकेच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली. परंतु मार्गिकेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
मुकुंद आरयूबी, पारसिक बोगदा आणि कळव्याजवळच १०८० झोपडीधारक असून ते प्रकल्पाआड येत आहेत. त्यामुळे भांईंदरपाडा येथील एमएमआरडीएच्या जागेत त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १०८० पैकी २०९ झोपडीधारकांची पात्रता पडताळणी करण्यात आली. त्यांनी पुनर्वसनास होकारही दिला. मात्र स्थानिकांनी भूसंपादन आणि पुनर्वसनास केलेल्या विरोधामुळे ८७१ जणांची पात्रता पडताळणी रखडली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प तीन वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटल्यानंतर आणि मोकळी जमीन उपलब्ध झाल्यानंतरच उन्नत रेल्वे मार्गिका पूर्ण होईल. त्यासाठी तीन वर्षे लागतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रकल्प खर्च वाढला
ऐरोली – कळवा उन्नत मार्गिका चार किलोमीटर लांबीची असून त्यासाठी ४७६ कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र प्रकल्प खर्च ५१९ कोटी ५६ लाख रुपयांवर पोहोचला आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण येथून थेट लोकलने कळवामार्गे ऐरोली, वाशी, पनवेलला जाणे शक्य होईल. त्यासाठी उन्नत मार्ग कळवा स्थानकाजवळ मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. कल्याण व्हाया कळवा ऐरोलीसाठीही दर दहा ते पंधरा मिनिटांनी लोकल उपलब्ध होऊ शकणार आहे.
शहर
- पुणे: प्रेमाचा छळ अन् पैशांची मागणी; कोरेगाव पार्कमध्ये तरुणाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.
- पुणे: पोहण्याचा मोह जीवावर; डिंभे कालव्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत!
- छत्रपती संभाजीनगर: पोहण्याचा मोह जीवावर; साई टेकडी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत!
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
महाराष्ट्र
- सूर्यघर वीज योजनेत महाराष्ट्र देशात चमकला! दोन वर्षांत ६ लाखांहून अधिक सौर प्रकल्प बसवून मिळवले देशात दुसरे स्थान.
- पुणे: प्रेमाचा छळ अन् पैशांची मागणी; कोरेगाव पार्कमध्ये तरुणाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.
- पुणे: पोहण्याचा मोह जीवावर; डिंभे कालव्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत!
- जालना: विहिरीत कोसळलेल्या बैलजोडीला वाचवण्यासाठी अख्खं गाव धावलं; यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन!
गुन्हा
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- बीड: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर व्हायरल करीन'; परळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधम गजाआड!
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: नीट (NEET) पेपर फुटीवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चा अनोखा इशारा! अभिजीत दिपकेंचे आक्रमक आंदोलन, सरकारला दिले गंभीर परिणामांचे संकेत.
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'
























Subscribe to my channel




