औरंगाबाद : गौताळा अभयारण्यातील वनविभागाच्या हिवरखेडा येथील कार्यालयातून जप्त केलेले पाच लाखांचे चंदन आणि मौल्यवान दगडाची चोरी झाली. सर्व यंत्रणा असताना ही चोरी झाली. जे अधिकारी जप्त केलेल्या वस्तूची नीट देखरेख करू शकत नाही, ते जंगल आणि वनविभागाची सुरक्षा कशी करणार, अशा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या चोरीसह सिल्लोड येथील खवल्या मांजर चोरीचे प्रकरणही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाबून टाकले. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरच संशय व्यक्त केला जाता आहे.
अशाच प्रकारे सोयगाव येथेही खवल्या मांजराची तस्करी होताना कारवाई करणाऱ्यांना पकडण्यात आले. नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यात आले. अजूनही या प्रकरणी कारवाई प्रलंबित आहे. त्यातच पुन्हा रविवारी मध्यरात्री जप्त केलेले चंदन, मौल्यवान दगड, सफेद मुसळी आणि डिंक यावर चोरांनी डल्ला मारला. चोरट्यांनी रेकी करून चोरी केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चोरीत साडेअकरा किलो चंदन, ३०१ किलो मौल्यवान रंगीबेरंगी दगड, साडेपाच किलो सफेद मुसळी, सात किलो डिंक, ३४२ किलो जळतण चंदनाचा समावेश आहे. जप्त केलेले हे साहित्य वनविभागाच्या औरंगाबाद कार्यालयात का ठेवले नाही, वाहन जाळल्याची घटना घडल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने पावले का उलचले नाही असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.
वन्यजीव विभागातर्फे वनपरिक्षेत्रात उन्हाळ्यात पाणवठ्याच्या माध्यमातून पाण्याची सुविधा दिली जाते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील परिक्षेत्रात तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यात वनजीव विभागातर्फे पाणीच टाकण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. पैठण, कन्नड, सिल्लोड-सोयगाव अन्य परिक्षेत्राताही हीच परिस्थिती आहे. विभागाला पाण्यासाठी पैसे नसल्याने तसेच इच्छाशक्ती नसल्याने पाणी टाकण्यात येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. यामुळे दर दोन दिवसाला मराठवाड्यात एका वन्यजीवाचा अपघातात, तसेच पाण्याअभावी मृत्यू होत आहे.
संरक्षणात कुठे खोट राहिली याच्या तपासणासाठी आम्ही विभागीय चौकशीचे काम हाती घेतले आहे. सहायक वनसंरक्षकाच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यात सीसीटीव्ही चेक करण्यात येणार आहे.
- डॉ. राजेंद्र नाळे, उपवन्यजीव संरक्षक
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



