नुकतेच अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीने मला २८ डॉलरची ‘काउबॉय हॅट’ भेट दिली. ही हॅट केवळ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहरा झाकून ठेवते म्हणूनच वेगळी नव्हती, तर ज्याप्रमाणे बुटांच्या छिद्रांमधून लेस ओवलेली असते तशीच त्या हॅटच्या चारी बाजूंनी फीत ओवलेली होती. त्या हॅटलाही चारही बाजूंनी छिद्रे होती. जशी तुम्ही फीत सोडता तशी हॅटच्या आतून एक मच्छरदाणी उघडते आणि चेहरा व मान झाकून टाकते, जी तुम्ही शर्टच्या कॉलरमध्ये खोचून बटण लावू शकता. बहिणीने माझा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये मी फिरत होतो आणि मच्छर मला चावत होते. त्यानंतर तिने ही हॅट खरेदी केली. तेव्हापासून रात्री बाहेर जाताना हा माझा आवडता पेहराव बनली आहे. कारण तेव्हा डास चावण्याची शक्यता असते. ती माझ्या टक्कल पडत असलेल्या डोक्याला झाकते, फॅशनेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डासांपासून बचाव करते. काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असले तरी मला फरक पडत नाही- कारण काही प्रमाणात ती मला संभाव्य आजारांपासून वाचवते. आतापर्यंत मला माहित नव्हते की ही हॅट घालून मी ‘टूल-बेल्ट जनरेशन फॅशन प्रमोटर’ बनलो आहे. आता हे काय आहे? तर ही अशा लोकांची फॅशन आहे, जे शारीरिक श्रम करतात आणि अशा आरामदायी कपड्यांवर व चांगल्या साधनांवर (टूल्स) खर्च करण्यास तयार असतात, जे सुरक्षा देतात. उदाहरणार्थ, सुरक्षा मानकांनुसार असलेले वर्क बूट्स. अनेक ‘जेन-झी’ तरुणांना आता हे उमजले आहे की, केवळ पदवीधर होण्यापेक्षा मेकॅनिक, प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन बनून जास्त कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत ते शारीरिक श्रमाच्या कार्यबलात सामील होत आहेत. म्हणूनच त्यांनी असे कपडे आणि फॅशन निवडली आहे, जी त्यांच्या कामाच्या प्राधान्यक्रमानुसार अधिक लवचिक (फ्लेक्सिबल) आहे. आणि जे लोक असे फंक्शनल फिट कपडे परिधान करतात, त्यांना ‘ट्रेड्सपीपल’ म्हटले जाते. आज ट्रेड्सपीपल म्हणजे फक्त तेच लोक नाहीत, जे निळा गणवेश घालून वर्कशॉपमध्ये असतात. गेल्या चार वर्षांत शॉप फ्लोअरचा मोठा कार्यबल बनलेले जेन-झी तरुण केवळ कामावर येता-जातानाच नाही, तर वर्कप्लेसवरही फॅशनेबल दिसू इच्छितात. यामुळे या कपड्यांची ओढ आता ‘ब्लू कॉलर’ संस्कृतीच्या पलीकडे गेली आहे. ब्रंट, लोव्हस यांसारखे मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड केवळ जगभरात स्टोअर्स उघडत नाहीत, तर ब्रँड-बिल्डिंग कंपन्यांच्या माध्यमातून ‘वर्कवेअरमधील वारसा’ (लेगेसी) देखील सांगत आहेत. परदेशात त्यांना कोणी केवळ कामगार म्हणू शकत नाही, तर तिथे त्यांना ‘स्ट्रीटवेअर कम्युनिटीज’ म्हटले जाते. हे वर्कवेअर अशा लोकांसाठी आहेत, जे त्यांचा वापर फॅशन प्रॉडक्ट म्हणून नाही, तर इक्विपमेंट्स (साधने) म्हणून करतात. वर्कवेअर हा आज अपेरल आणि फुटवेअर इंडस्ट्रीमधील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे, ज्याची किंमत लाखो डॉलर्स आहे. ‘बकेट टॉक’ नावाचा एक पॉडकास्ट आहे, जो वेल्डर्स, प्लंबर्स, शेतकरी आणि युटिलिटी लाइनमन यांसारख्या लोकांसाठी आहे. यात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे लोक हलक्या आणि अधिक आरामदायी कपड्यांकडे वळत आहेत. हे कपडे वेगवेगळ्या हवामानात आणि स्वच्छतेच्या परिस्थितीत काम करण्यास उपयुक्त ठरत आहेत. आठवा की कॉलेजच्या दिवसांत आपल्यापैकी अनेक जण बसमध्ये ॲप्रन घालून फिरत असत, जणू आपण मेडिकलचे शिक्षण घेत आहोत, जरी आपण बीएस्सी किंवा एमएस्सीचे विद्यार्थी असू. त्याचप्रमाणे आज ही टूल-बेल्ट जनरेशन आपले आधुनिक स्ट्रीटवेअर घालून आरामात बस स्टँड आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत आहे. इतरांना दाखवण्यासाठी आपण कपडे घालत होतो, ते दिवस आता गेले. टूल-बेल्ट जनरेशन मानते की ‘माय कम्फर्ट, कम्स फर्स्ट’ (माझा आराम आधी येतो). आणि यात काही चुकीचेही नाही. त्यांच्या नवीन कार्गो पँट्स आपल्या काळातील कडक कॅनव्हास पँट्सपेक्षा कितीतरी जास्त स्ट्रेचेबल आहेत. मी पाहतो की सोशल मीडियावरही हे तरुण आपल्या आरामाला प्राधान्य देत मेकॅनिक, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन्सचे जोडे आणि पेहराव घालत आहेत.
फंडा असा आहे की, टूल-बेल्ट जनरेशनच्या पेहरावाच्या नवीन स्टाइलबाबत पूर्वग्रहदूषित (जजमेंटल) होऊ नका. कारण त्यांना इतरांच्या नजरेत चांगले दिसण्यापेक्षा स्वतःचा आराम जास्त महत्त्वाचा वाटतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
महाराष्ट्र
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




