एन. रघुरामन यांचा कॉलम:कधीकाळी वडील जे काम सहजपणे करायचे, आज शाळा ते वैज्ञानिकरीत्या करत आहेत

बालपणी तुमच्या आयुष्यातील पहिला सर्वात उत्तम टप्पा कोणता होता? आपल्यापैकी बहुतांश लोकांसाठी तो म्हणजे तीनचाकी सायकल चालवणे आणि पालकांकडून ‘खप छान’ ऐकणे हाच असेल. पण आयुष्यातील किंवा एखाद्या प्रोजेक्टमधील महत्त्वाचे निर्णायक वळण, यश किंवा टप्प्याचे सर्वात उत्तम, क्लासिक आणि निर्णायक उदाहरण ते असायचे, जेव्हा तुम्ही सायकल चालवत आहात आणि वडिलांनी ती मागून पकडलेली नसते. अनेक पिढ्यांपासून आपल्यासारख्या मुलांनी हे कौशल्य ड्राइव्ह-वेमध्ये (श्रीमंतांच्या मुलांसाठी), बाजूच्या रस्त्यांवर (कॉलनीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय मुलांसाठी) आणि माझ्यासारख्या इतर मुलांनी (जर सामान्य माणसाची मुले असतील तर) चाळीच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये शिकले आहे. साधारणपणे जोपर्यंत आपण संतुलन राखायला शिकत नाही, तोपर्यंत मोठा भाऊ-बहीण किंवा वडील सायकल मागून पकडून ठेवायचे. मग एके दिवशी अचानक आपल्याला समजायचे की ते मागे नाहीत आणि सायकल चालत आहे. त्या दिवशी आपण पडूही शकलो असतो, सायकल एखाद्या गोष्टीला धडकू शकली असती किंवा आपल्याला खरचटूही शकले असते. पण त्याच दिवशी अचानक आपल्याला वाटायचे की आपण ‘मोठे’ झालो. पण आजच्या काळात हा अनुभव एका नव्या पातळीवर पोहोचला आहे. आज किंडरगार्टनच्या मुलांना शाळेच्या जिम्नॅशियम हॉल किंवा प्लेग्राउंडमध्ये त्यांची पहिली बॅलन्स-बाइक मिळते. त्यांना हेल्मेटसारखी सुरक्षा साधने घालून अशा बाइकवर बसावे लागते, जी पॅडल-फ्री असते आणि तिला ते पायांनी पुढे ढकलतात. मुले ऑरेंज ट्रॅफिक-कोनपासून बनवलेल्या गोलाकार रस्त्यावर बाइक स्टार्ट आणि स्टॉप करतात, तर आजूबाजूला पीटी शिक्षकांसह इतर प्रौढ लोक त्यांना पाहतात आणि मार्गदर्शन करत असतात. हे शिक्षक मुलांना बॅलन्स, कोअर स्टॅबिलिटी, सिक्वेन्सिंग आणि बॉडी-अवेअरनेस शिकवतात. या प्रक्रियेत प्रत्येक स्टेप मागील स्टेपवर आधारित असते. या वेळी प्रत्येक नर्व्हस चेहऱ्यासोबत एक हसरा चेहराही असायचा. प्रत्येक किंकाळीसोबत एक हास्यही असायचे. तुम्ही विचार करत असाल की हे सगळं कुठे होत आहे? अमेरिकेतील 2 हजारांहून अधिक एलिमेंट्री शाळांनी बाइक रायडिंगला मुलांच्या फिजिकल एज्युकेशनचा भाग बनवले आहे. अन्यथा या मुलांनाही हे शिकवण्यासाठी एखाद्या प्रौढ व्यक्तीची किंवा मोठ्या भाऊ-बहिणीची वाट पाहावी लागली असती. 8 लेसन असलेल्या या अभ्यासक्रमात मुलांना हळूहळू शिकवले जाते. सुरुवातीला ते फक्त बाइकसोबत चालणे, योग्य आकाराच्या बाइकवर सहज होणे आणि नंतर दोन्ही पाय उचलून बॅलन्स करणे शिकतात. त्यानंतर प्रौढ व्यक्ती पॅडल लावतात आणि विद्यार्थी पूर्णपणे सायकलिंग करतात. काही शाळा मुलांना पादचाऱ्यांची सुरक्षा शिकवण्यासाठी इतर कार्यक्रमांशीही जोडल्या जातात. आपल्यापैकी अनेकांनी हा प्रसंग पाहिला असेल, जेव्हा एक तरुण आई आपल्या मुलाला प्रॅममध्ये घेऊन एखाद्या इमारतीतून बाहेर पडते आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. ज्या झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते, तिथे तिचा सामना वेगाने जाणाऱ्या सायकल आणि इतर वाहनांच्या गर्दीशी होतो आणि त्यापैकी कुणीही ब्रेक लावण्याचा विचार करत नाही. अखेर जेव्हा थोडी जागा मिळते तेव्हा ती पळत रस्ता ओलांडते. तिला खात्री नसते की हे रायडर्स झेब्रा क्रॉसिंगच्या नियमांचे पालन करतील आणि तिला मुलासह रस्ता ओलांडू देतील. अशी घटना सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांना अगदी अचूकपणे समोर आणते. हा अतिरिक्त धडा विशेष मुलांसाठी खूप उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, सिएटलच्या एका शाळेत मुलांना रस्ता कसा ओलांडायचा, ड्रायव्हर्ससोबत आय-कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि जर कुणी असुरक्षित वर्तन करत असेल तर ते कसे ओळखायचे, हे शिकवले जाते. तिथले शिक्षक सांगतात की, असे कार्यक्रम मुलांमध्ये स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करतात- अगदी तशीच भावना, जी आपल्याला पहिल्यांदा वडील किंवा मोठ्या भावाच्या आधाराशिवाय बाइक चालवताना निर्माण झाली होती. फंडा असा आहे की, स्पोर्ट‌्स क्लासमध्ये बास्केटबॉल खेळण्याप्रमाणेच बाइक-रायडिंग हे आता हळूहळू एक बेसिक स्किल बनत चालले आहे. पण या वस्तुस्थितीकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही की, बायकिंग हे लाइफ-लाँग कौशल्य आहे. आणि असे धडे मुलांच्या मनात तेव्हाही कायम राहतात, जेव्हा ते बाइक चालवण्याच्या वयाच्या खूप पुढे गेलेले असतात.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *