जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या काही इच्छा,अपेक्षा आणि आकांक्षा असतात. इच्छा रहित जगण्याची कल्पना कोणताही मनुष्य करू शकत नाही. जगत असताना इच्छा आणि अपेक्षा काय आहेत हे प्रत्येकाच्या आपल्या जीवनशैलीवर आणि जीवन जगण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा या प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडण आणि संस्कारावर अवलंबून असतात. मनुष्य हा अपूर्ण आहे. संसारात आहे म्हणजे कोणी ही अद्याप पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. अपूर्ण या अर्थाने की तो अपेक्षेच्या परिघामध्ये आहे. मनुष्याला शरीर आहे, म्हणून खाण्या-पिण्याच्या अपेक्षा आहेत. त्याला वाणी किंवा भाषा आहे म्हणून इतर व्यक्तिमत्व आणि समाजाची अपेक्षा आहे. त्याला मन आहे म्हणून मान-सन्मान, इच्छा, प्रतिष्ठा इत्यादी अपेक्षा असतात. माणूस एक असतो परंतु अपेक्षा हजारो असतात. आणि त्या सर्व अपेक्षा बाह्य जगता मधून पूर्ण होत असतात. बाह्य जगातून तो ग्रहण करतो आणि अंतर्मन भरतो. म्हणूनच त्याच्या व्यक्तिगत सीमा सामाजिक बनतात. सामाजिक संवेदनामध्ये वैयक्तिक नैतिक आचरणाची अपेक्षा असते. त्यामध्ये हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह, संग्रह याचा निषेध स्वाभाविकपणे येतोच. परंतु समाजामध्ये जगत असताना माणसाच्या व्यक्तिगत अतिरिक्त इच्छा,अपेक्षा,आकांक्षा मात्र त्याला संघर्षाकडे नेतात. आणि या कारणानेच समाजामध्ये अशांतता आणि परस्पर राग द्वेष निर्माण होतात. आध्यात्मिक आणि नैतिक नियमांनी व्यक्तीचा विकास अशा पद्धतीने अपेक्षित केला की जो बाह्य जगातून निरपेक्ष होऊन स्वतःमध्ये संतुष्ट आणि तृप्त अशा प्रकारचे जीवन जगणारा असावा. समाजामध्ये सर्वांचे संतुलित आचरण आणि स्थिरतेच्या अपेक्षेने प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक पातळीवर संयम, संतोष आणि संग्रह प्रमाण गृहीत आहे. जगणे, उपजीविका, इच्छा आणि समाधान याला एक नैतिकतेचा परीघ आहे, धार्मिकतेची किनार आहे. त्याच बरोबर अर्थशास्त्राचा दृष्टिकोन देखील आहे हे सत्य नाकारता येणार नाही.अर्थशास्त्राच्या दृष्टीने अनिवार्यता पेक्षा आवश्यकतेचे क्षेत्र मोठे असते. इच्छेचे क्षेत्र आवश्यकतेपेक्षा मोठे असते. सर्व इच्छा ह्या आवश्यकता असतातच असे नव्हे. काही इच्छा या आवश्यकतेपेक्षा अधिक, जास्त आणि मोठ्या ही असू शकतात. जगण्याच्या साधारण आवश्यकता आणि उत्पन्न इच्छा यांचे प्रमाण संतुलन हे प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर आणि संस्कारावर अवलंबून आहे हेही खरे. मनुष्य ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये जगत असताना त्याच्या उद्देशाच्या केंद्रामध्ये संतोष समाधान आहे की इच्छा आकांक्षांची पूर्तता यावर त्याच्या जीवनातील मानसिक स्थिरता अवलंबून असते. इच्छा असणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे. मनुष्याच्या आवश्यकता या भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रितीरिवाज, शारीरिक अपेक्षा, स्पर्धा, आंतरिक भावनांची पूर्तता यावर अवलंबून असतात. समाधान आणि संतोष वृत्तीने जीवन जगण्यासाठी मनुष्याला सामाजिक आर्थिक परिस्थितीशी झगडावे लागते. तो संघर्ष किती हे त्याच्या आणि आकांक्षावर अवलंबून असते. त्या इच्छा आवश्यक अनिवार्य किती आहेत आणि भौतिक अनावश्यक किती आहेत यावर जगण्यातील संघर्षाचे प्रमाण निर्धारित होते. जगणं, इच्छा आणि आवश्यकतांची पूर्तता यामध्ये अर्थशास्त्र आणि आर्थिक परिस्थिती ही अत्यंत महत्त्वाची बनते. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता सीमित असतात. कदाचित त्याच्या परिस्थितीमुळे त्या दमित झालेल्या असू शकतात. तो फक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक काय आहे त्याच्या पूर्ततेकडे लक्ष देऊन कार्यरत असतो. याउलट आर्थिक सुबत्ता, सुदृढता असणाऱ्या व्यक्तींच्या अतिरिक्त आवश्यकता याच अनिवार्यता बनलेल्या असतात. म्हणून तो केवळ जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता न करता त्यामध्ये विलासितायुक्त जीवनशैलीला पूर्ण करण्याच्या मागे लागलेला असतो. धर्माने प्रभावित असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता नैतिक दृष्टीने जीवनशैलीत परिवर्तित होतात. ज्या नैतिक आणि धार्मिक आदर्श यांना तो मानत असतो त्या मान्यतेनुसार त्याच्या आवश्यकता निर्माण होतात. म्हणूनच अशा व्यक्तीच्या आवश्यकता संतुलित असतात आणि जीवनामध्ये संतोष वृत्ती आणि समाधाना असते. जीवन जगत असताना कमीत कमी अनिवार्यता आणि इच्छाआधारीत आवश्यकता यानुसार मनात सतत एक द्वंद्वात्मक संघर्ष असतो. इच्छा आकांक्षांचा खड्डा इतका खोल आणि मोठा असतो की तो कधीही भरला जाऊ शकत नाही. या सत्याची स्वीकृती धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्हींनी केलेली आहे. अतिरिक्त आवश्यकता किंवा लोभ, मोह, स्पर्धा,अनियंत्रित भावना यांनी मनातील आर्तता वाढत जाते, ही आर्तता पुढे अशांती आणि रौद्रते मध्ये परिवर्तित होते. आणि अशांतता, अनैतिकता आणि हिंसेकडे वळते. अतिरिक्त इच्छा आकांक्षांची पूर्तता येण केण प्रकारेण पूर्ण करण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करावा लागतो. आणि त्यातच जीवन जगण्यासाठी जी स्थिरता आणि समाधान हवे असते ते लोप पावते. अशा प्रकारचे जगणे सतत आंतरिक शल्याचे आणि असंतुलित, अस्थिर असे होऊन जाते. विद्यमान जगामध्ये जगत असताना आपण मागे नसावे. आधुनिकतेच्या स्पर्धेमध्ये आपणही असायलाच हवे. जग पुढे जावे आणि आपण आहे तिथेच मागे राहावे हेही अयोग्य. आपण मागासलेले निश्चितच नसावे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग असायला हवा. यापासून दूर नसावे. परंतु भौतिक स्पर्धेच्या आधुनिक जगामध्ये जगत असताना त्याने आंतरिक अस्थिरता निर्माण न होऊ देण्याची कला अवगत असावी. ही कला म्हणजेच आंतरिक समाधानासाठी इच्छा परिमाण. आपण प्रगत असावे परंतु संस्कार सोडून नव्हे. आपण स्पर्धेत असावे परंतु आतून अस्थिर नसावे. धर्म,अर्थशास्त्र आणि नैतिकता यांचे स्वतःचे विषय क्षेत्र आणि नियम सत्य आहेत. असे असताना मात्र जीवन जगण्याचा उद्देश आणि दृष्टीकोण काय असावा हे आपण आपल्या परिस्थितीने निवडायचे असते. आणि म्हणून या ठिकाणी संस्कार आणि संतुलित जीवनशैली अत्यंत महत्त्वाची बनते. धर्मगुरू आणि सामाजिक मार्गदर्शकांनी यासाठीच इच्छा परिमाण , संतोष वृत्ती, संग्रहाची सीमा , इच्छा नियंत्रण , नियम, संयम , जीवनशैलीतील पवित्रता, यां बाबीं चा संस्कार दृष्टीने आचरणात समावेश केला आहे. म्हणूनच मला वाटते, हा संतोष वृत्तीचा विचार आणि केवळ अनिवार्य आवश्यकता केंद्रस्थानी ठेवून जगलेले जीवन निश्चितच समाधानाचे असेल.
(बलराज संघई, 9420015108 / वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


