अमरावतीमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

अमरावती : वेळ वाईट होती आणि काळानं रस्त्यात गाठलं. अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातानं परिसरात खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर भीषण अपघात झाला. 

या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार अपघातात बहिरम इथल्या 3 जणांचा आणि बोधड इथल्या 3 जनांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *