अजितदादा हे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते; सभागृहात देवेंद्र फडणवीस भावुक|VIDEO

image

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी फडणवीस बोलताना म्हणाले, कधीही असा विचार केला नाही की, अशाप्रकारचा प्रस्ताव मला मांडावा लागेल. मी माझा जवळचा एक मित्र गमावला आहे. अजित पवारांना सामान्य माणसांच्या अडचणी माहीत होत्या, दादांमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार सहावेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. दादा नेहमीच म्हणायचे की, मी कधीतरी मुख्यमंत्री होईल. पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. मी आज हे म्हणू शकतो की, अजितदादा हे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता जो आज अजित पवार यांच्या रूपाने आपल्यात नाही. कधीतरी नियतीने त्यांचे ते स्वप्नही पूर्ण केले असते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *