पिंपरी : पुण्यात झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह

पिंपरी : हिंजवडीत आयटी पार्क भागात एका झाडाला मुलीचा मृतदेह लटकवलेला आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मारेकरांनी या मुलीचा निर्घृणपणे खून करुन नंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, हिंजवडीत आयटी पार्क परिसरातील मुळा नदीच्या काठी एका निर्जनस्थळी झाडाला हा मृतदेह लटकवलेला आढळून आला आहे. मयत मुलीचा चार ते पाच आठवड्यांपूर्वी खून करुन तिचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या मृतदेहाचं शवविच्छेदन आणि डीएनए टेस्टसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, "या प्रकरणाच्या तपासासाठी बेपत्ता लोकांची माहिती मिळणं गरजेचं आहे. जर एखादी महिला किंवा मुलगी बेपत्ता असेल तर त्यांच्या कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना द्यावी. यावरुन या मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होईल. ओळख पटल्यानंतर ही घडामोड कशी घडली याचा उलगडा होऊ शकेल"



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply