पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन जवळपास ५८ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालक डॉ. स्नेहा जोगळेकर आणि वरुण जोगळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खडकवासला येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२० पासून सुरु होता.
फिर्यादी यांनी एका जाहिरातीवरुन डॉ. स्नेहा जोगळेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी घरीच हॉलमध्ये तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना वेगवेगळ्या पदासाठी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. काही जणांना हॉटेलमध्ये हाऊस किपिंग तर काहींना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कामासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियाम नोकरी लावतो, असे अमिष दाखविले.
फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले पण नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरिता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल करु, अशी धमकी दिली फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.
एकामागोमाग थापा अन आश्वासनावर ठेवले झुलत
डॉ. जोगळेकर हिने सर्वांना ११ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यातील २ लाख रुपये दिल्यावर व्हिसा मिळेल. त्यानंतर पुढील ४ लाख दिल्यानंतर तिकीट देऊ असे सांगितले होते. उरलेले ५ लाख तुमच्या पगारातून कापून घेतले जातील, असे सांगून या तरुणांचा विश्ववास संपादन केला. त्यांना मॅरीटाईम क्रू चा व्हिसा पाठविला त्याची या तरुणांनी चौकशी केली. तेव्हा तो फक्त सी पोर्टवर कामासाठीचा होता. नोकरीसाठी नव्हता. त्यानंतर जोगळेकर हिने आमची तिकडे कंपनी आहे. ती तुमची सर्व राहणे, जेवण, वाहतूक याची सोय करणार असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊन असतानाही वंदेभारतम सेवेतून तुम्हाला पाठविणार असल्याचे सांगितले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया सरकारचा जी आर दाखवून त्यांचे विमान रद्द झाल्याचे सांगून फसवणूक केली. त्यानंतर त्यांन दरवेळी पुढचे वायदे करुन झुलवत ठेवले.
शहर
- मान्सून महाराष्ट्रात दाखल! पुण्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी
- जगातील सर्वात मोठी पुरी! २४ तासांपेक्षा जास्त वेळ राहते गरमागरम; जाणून घ्या सुलतानपूरच्या पारंपरिक 'कोहडा पूडी'चे अनोखे गुपित
- ताजमहालमध्ये वानरसेनेची 'पूल पार्टी'! उकाड्याने हैराण माकडांनी वजू तलावात मारल्या डुबक्या, व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाचे स्पष्टीकरण
- 'चूल आणि मूल' सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रँड! बुंदेलखंडमधील महिलांची कमाल, गाव बनले ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र
महाराष्ट्र
- आमीर खान पुन्हा विवाहबंधनात! ५ जुलै रोजी गौरी स्प्राटसोबत करणार तिसरे लग्न; अभिनेत्याने केली बातमीला दुजोरा.
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- जगातील सर्वात मोठी पुरी! २४ तासांपेक्षा जास्त वेळ राहते गरमागरम; जाणून घ्या सुलतानपूरच्या पारंपरिक 'कोहडा पूडी'चे अनोखे गुपित
- ताजमहालमध्ये वानरसेनेची 'पूल पार्टी'! उकाड्याने हैराण माकडांनी वजू तलावात मारल्या डुबक्या, व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाचे स्पष्टीकरण
- 'चूल आणि मूल' सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रँड! बुंदेलखंडमधील महिलांची कमाल, गाव बनले ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र
- अर्ध्यारात्री घरगुती गॅसचा मोठा झटका! एलपीजी सिलेंडर २९ रुपयांनी महागला; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!




























Subscribe to my channel
