पुणे: महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडावर लटकलेला आढळल्याने खळबळ !

पुणे: पुण्यामधील आयटी हब म्हणून ओळखले जाणाऱ्या हिंजवडीमध्ये झाडावर महिलेचा मृतदेह आढळला आहे. यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मुळा नदी पात्रामध्ये वाढलेल्या उंबराच्या झाडाला हा मृतदेह लटकलेला आहे. ही महिला वरती कशी पोहोचली, तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे? याबरोबरच अनेक प्रश्न पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आधी ओळख पटवणे गरजेचे आहे, तेव्हा सगळ्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

आयटी हब हिंजवडी आणि त्याच्या जवळच माण गावामधून आहे. बघता क्षणी ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांना बांधला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केले आहे. पण हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, ४ ते ५ महिन्यांपासून तो फांदीला लटकत असावा, शिवाय ही आत्महत्या नाही या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मग ही हत्या असावी असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आहेत. मृतदेहाची अवस्था पाहता केवळ हाडं आणि महिलेचा गाऊन शिल्लक राहिला आहे.

यामुळे मृतदेह हलवणे तपासाच्या दृष्टीने अडचणीचे ठरले आहे. आधी शवविच्छेदन करणं गरजेचे आहे. यासाठी हिंजवडी पोलिसांचे कर्मचारी रात्रभर मृतदेह लटकत असलेल्या उंबराच्या झाडाजवळ तैनात होते. आता काही वेळात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांचं पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. नदीच्या प्रवाहावरच हा मृतदेह असल्याने अग्निशमन दलाची मदत ही घेतली जाणार आहे. मृतावस्थेत आढळलेली ही महिला कोण आहे? ती इथे कशी काय पोहोचली? तिची हत्या झाली आहे का? झाली असेल तर मारेकरी कोण आहे? या सर्व प्रश्नांचा छडा हिंजवडी पोलिसांना लावायचा आहे.

हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह मुळा नदी पात्रातील झाडावर लटकवून ठेवले, असा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलिसांनी दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (SPI) बाळकृष्ण सावंत यांच्या माहितीनुसार, "माण गावाच्या डोंगराळ भागात सहसा कोणीही फिरकत नाही. मात्र, बुधवारी तरुणांच्या टोळक्याने या ठिकाणी येऊन झाडावर मृतदेह बघितला. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. ते पुढे म्हणाले की, आम्हाला महिलेचं वय, नाव किंवा इतर कोणतीही माहिती अद्याप समजू शकली नाही. ही हत्या आहे की आत्महत्या हे देखील अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply