Pune Metro : काय म्हणता? पहिल्याच दिवशी 7 तासात तब्बल 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास

Pune Metro :पंतप्रधान मोदींनी (PM Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. उद्घाटनानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे

Pune Metro : काल मोठ्या दिमाखात पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यामध्ये मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रात्री दहा पर्यंत या फेर्‍या सुरू होत्या. उद्घाटनानंतर नंतर काही तासात वनाज ते गरवारे या मार्गावर 15842 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 4616 नागरिकांनी प्रवास केला आहे. रविवारी एकूण 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. यामध्ये 1979 प्रवाशांनी मोबाईलवरुन तिकीट काढले तर बाकीच्यांनी काऊंटरवरुन तिकीट खरेदी केले असल्याची माहिती आहे. 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply