बारामती : सुप्रिया सुळे करणार अमित शाहांना तक्रार, लवकरच दिल्लीला रवाना

बारामती : ‘‘देशात जेव्हा एखादा पेपर फुटतो, तेव्हा त्याची चौकशी केली जाते, महाराष्ट्रात सातत्याने ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय यंत्रणांबाबत संवेदनशील माहिती एखादी व्यक्ती जेव्हा अगोदरच देते, या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास मी ही बाब आणून देणार आहे,’’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना सांगितले.
‘राज्यातील काही नेते अगोदरच ईडी किंवा प्राप्तिकर किंवा केंद्रीय यंत्रणा काय कारवाई करणार, हे कसे काय जाहीर करतात?’ असा प्रश्न विचारल्यानंतर सुळे यांनी वरील विधान केले. त्या म्हणाल्या, ‘‘ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्था आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. असे असताना त्यांच्या कारवाईची माहिती अगोदरच बाहेर जात असेल; तर देशाचे ऐक्य व सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ही बाब मी अमित शहा यांच्या लक्षात आणून देणार आहे.’’
फडणवीस यांना टोला देवेंद्र फडणवीस यांनी ‘उत्तर प्रदेश झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असं विधान केलं होतं, त्याबाबत सुळे म्हणाल्या, ‘‘विरोधी पक्षांनी अशा घोषणा करणे महत्त्वाचे असते, विरोधकांनाही आमदारांसह सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी अशा घोषणा कराव्या लागतात, त्यात काही गैर आहे, अस मला तरी वाटत नाही.’’


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply