नाशिक : गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक : भद्रकालीतील खैरे गल्लीतील १८ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला आहे. गौरी मयूर भावसार (वय १८, रा. दीक्षित चाळ, खैरे गल्ली, जुने नाशिक) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. 

गौरी हिने शनिवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *