पुणे : देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार केंद्रे होणार सुरू

पुणे: संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशभरातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयुर्वेदिक उपचार केंद्राचा लाभ राज्याला देखील मिळणार आहे. यामध्ये पुण्यातील खडकी आणि देहूरोड या दोन कॅन्टोन्मेंट रुग्णालयांचा समावेश आहे. पारंपारिक आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळावा हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राकेश कोटेचा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार प्रणाली उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरविणार आहे. तसेच या ३७ रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक केली जाणार आहे. या ३७ आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये काम सुरु करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, संरक्षण मालमत्ता महासंचालनालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालय समन्वय साधत आवश्‍यक ती पावले उचलणार असल्याचा निर्णय सुद्धा बैठकित घेण्यात आला. येत्या १ मे पासून हे आयुर्वेदिक उपचार केंद्र कार्यान्वित होणार आहेत.



हे पण वाचा-

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply