
हैदराबाद:तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. पीडित मुलगी पबमध्ये पार्टी करून घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अलिशान कारमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आले. संशयित आरोपींमध्ये हायप्रोफाइल नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत चार आरोपी सामील आहेत. त्यातील एक अल्पवयीन आहे. तसेच एका आमदाराचा मुलगा संशयितांमध्ये असल्याची माहिती आहे. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलगी ज्या पार्टीमध्ये गेली होती, तिथे एका आमदाराच्या मुलासह एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही होता. पीडितेने एका आरोपीची ओळख पटवली असून, तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी कलम ३५४ आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. १७ वर्षीय पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी त्यानंतर कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला होता. तक्रारदारांच्या माहितीनुसार, मागील शनिवारी ही घटना घडली होती. पीडितेच्या मानेवर खुणा होत्या. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिला विचारणा केल्यानंतर, एका पबमध्ये झालेल्या पार्टीमध्ये गेले असता, काही जणांनी तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले, असे तिने सांगितले.
रिपोर्टनुसार, पार्टीतून निघून बाहेर आल्यानंतर पीडिता आरोपींच्या कारमध्ये बसली. त्या अलीशान कारमध्ये तीन ते चार मुले होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कार निर्जन ठिकाणी थांबवण्यात आल्यानंतर कारमधील तरुणांनी तिला आधी मारहाण केली. दरम्यान, मुलीच्या जबाबानुसार, आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पबमधील पार्टीत सहभागी झालेले आणि तिथे काम करणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

