पुणे - धक्कादायक! हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून केली 2 भिकाऱ्यांची हत्या, १ जखमी

पुणे - पुण्यातील सासवड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने ३ कचरा वेचक भिकाऱ्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून निर्दयी खून केला आहे. या घटनेत २ भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू असून १ भिकारी गंभीर जखमी आहे. एका हॉटेल चालकाने कचरा वेचक भिकाऱ्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या आंगावर उकळतं पाणी टाकून त्यांचा खून केला आहे. ही घटना 23 मे ला सासवड मध्ये घडली आहे.

या हत्या कांडातील मयत तिन्ही भिकारी हॉटेल जवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून आरोपीने या तिघांना आधी काठीने मारहाण केली. मारहाण केल्यावर भिकारी अजून कसे गेले नाहीत म्हणून आरोपीने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिकाऱ्यांच्या अंगावर ओतल.

यात २ भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू असून १ भिकारी गंभीर जखमी आहे. ज्या ठिकाणी हा हत्याकांड झाला त्या ठिकाण पासून सासवड पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *