भारताने 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर डबल धमाका केला. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपला सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. भारताने या विजयासह सुपर 8 मध्ये धडक दिली. त्याआधी रविवारी दुपारी मुंबईकर राधा यादव हीच्या नेतृत्वात इंडिया ए वूमन्स टीमने पाकिस्तानला पराभूत करत एमर्जिग आशिया कप 2026 स्पर्धेतील विजयाचं खातं उघडलं. त्याआधी महिला ब्रिगेडला यूएई विरुद्ध पराभूत झाल्याने उलटफेरचा सामना करावा लागला होता.
इंडियाच्या ए टीमने पाकिस्ताननंतर नेपाळला लोळवलं. महिला ब्रिगेडने मंगळवारी 17 फेब्रुवारीला नेपाळ टीमला पराभूत केलं. इंडिया ए टीमने यासह एमर्जिंग आशिया कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अर्थात सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.
भारताचा 47 चेंडूत विजय
भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन राधा यादव हीने फिल्डिंगचा निर्णय घेत नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी राधा यादव हीचा फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजंनी नेपाळला 18 ओव्हरमध्ये 78 रन्सवर गुंडाळलं. भारतासाठी तनुजा कंवर हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. मिन्नू मणी हीने तिघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन राधाने 2 विकेट्स मिळवत नेपाळचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.
वृंदा गणेशची विजयी खेळी
भारताने त्यानंतर 79 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 7.5 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या.भारतासाठी वृंदा गणेश हीने सलग दुसऱ्या सामन्यात नाबाद आणि विजयी खेळी साकारली. वृंदाने पाकिस्तान विरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावलं होतं. तर आता वृंदाने नेपाळ विरुद्ध सर्वाधिक आणि नाबाद 39 धावा केल्या. वृंदाने या 18 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार लगावले. अनुष्का शर्मा हीने 10 धावांचं योगदान दिलं. तेजल हसबनीस हीने 18 धावा केल्या. तर राधा यादव हीने नाबाद 1 धाव करत भारताच्या विजयात बॅटिंगनेही योगदान दिलं.
पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश
दरम्या ए ग्रुपमधून भारतानंतर पाकिस्तानच्या ए टीमनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानने यूएईला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट मिळवलंय. तर बी ग्रुपमधून बांगलादेशही सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. आता या बी ग्रुपमधून थायलंड ए आणि श्रीलंका ए या दोघांपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




