
पुणे : शहराला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची असलेली गरज सातत्याने अधोरेखित झाल्याने विमानतळासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुण्याच्या पायाभूत आणि नागरी सेवासुविधा आणि विकासाच्या प्रक्रियेबाबत राजकीय पक्षांची ध्येयधोरणे आणि दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चासत्राचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे शहारध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, आपचे राज्य संघटक, शहर कार्य अध्यक्ष विजय कुंभार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रवक्ता संतोष पाटील, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मोठे शहर असूनही पुण्याला स्वतंत्र विमानतळ नाही, ही खेदजनक बाब आहे. शहराला तीन विमानतळांची आवश्यकता आहे. लोहगांव विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण झाले पाहिजे. विमानतळाच्या मुद्दय़ाचा समावेश जाहीरनाम्यात असायला हवा, असे सुधीर मेहता यांनी सांगितले. यावर बोलताना माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, की विमानतळ शहराची गरज आहे. पुणे विभागासाठीही विमानतळ आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे असणारे शहर, शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. विमानतळासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम राज्य शासनाकडून सुरू आहे. मात्र विमानतळासाठीची सर्व राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. निवडणूक जाहीरनाम्यात विस्तारीकरणाचा मुद्दा घेण्यात येईल. विमानतळासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अविनाश बागवे यांनी दिले. मेट्रो मार्गिकेलगत चार चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर झाल्याने पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण येणार आहे. नागरी सुविधा कोलमडून पडणार आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गिकेलगत चार एफएसआयला विरोध करावा लागेल, असे अॅड. वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सत्ता मिळाल्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न हाती घेतला जाईल, असे आश्वासन दिले. स्वच्छतागृहासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात समिती स्थापन झाली मात्र पुढे काही झाले नाही, असे त्यांनी सांगितले. मुळा-मुठा नदीची स्वच्छता करून हरित पुणे संकल्पनेची अंमलबजावणी केली जाईल, असे शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले. तर सत्ता मिळाल्यानंतर क्षेत्रसभेला प्राधान्य दिले जाईल, स्वच्छतागृह आणि अन्य समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असे मनसेचे संतोष पाटील यांनी नमूद केले.
चेंबरकडून पाठबळ : बेकायदा जाहिरात फलक, हरित पुणे, विमानतळाच्या मुद्दय़ाबरोबरच चर्चासत्रात नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचा राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात समावेश करावा. त्यासाठी आवश्यक मदत आणि पाठबळ चेंबरकडून दिले जाईल, असे आश्वासन चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिले. तर स्वच्छता, पर्यावरणाबाबत शहर नवा आदर्श प्रस्थापित करेल, असे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


